Thursday, January 15, 2026

Epaper

दारू-पैशांच्या वादातून चिमूर येथे युवकाचा खून, नेहरू शाळेच्या मागे आढळला मृतदेह .अवघ्या 3 तासात चिमूर खून प्रकरण उघडकीस

दारू-पैशांच्या वादातून चिमूर येथे युवकाचा खून,

नेहरू शाळेच्या मागे आढळला मृतदेह
◾अवघ्या 3 तासात चिमूर खून प्रकरण उघडकीस

माझा मराठी समाचार
चिमूर / जावेद पठाण

चिमूर शहरातील नेहरू विद्यालयाच्या मागील भागात काल शनिवार ला ३ जानेवारी च्या रात्री अज्ञात मारेकर्‍यांनी खून करून नेहरू शाळेच्या मागील परिसरात आकाश प़भाकर उताने वय ३१ वर्षे राहणार तनीस काॅलनी, ठक्कर वार्ड चिमूर या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह रविवार ला सकाळी आढळून आल्याने चिमूर शहरात खळबळ उडाली आहे. चिमूर पोलिसांनी तपासाची चक़े अतीवेगाने फिरवुन अवघ्या तीन तासात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मृतक आकाश उताने ची आई उषा प़भाकर उताने यांचे आज रविवार ला दिलेल्या फिर्यादी वरून चिमूर पोलीस पथकासह घटना स्थळी दाखल होऊन घटना स्थळ पंचनामा केला व प़ेत उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले पोलीसांच्या
प्राथमिक अंदाजा नुसार दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या वादातून मित्रांनीच डोक्यावर दगडाने वार करून आकाश प्रभाकर उताणे याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

फिर्यादीवरून पोलिसांनी अप.क्र. 02/२०२६ कलम 103(1) बि एन यस (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, आणि पो.नि. दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. सपोनि. ताळीकोटे, पोउपनि. देरकर, पोहवा. सचिन साठे, प्रमोद पढाल, प्रमोद पिसे, सोनू मोहुर्ले, पो.अं. सचिन खामनकर, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके,रुपेश शामकुळे, विकास बारसागडे, गणेश वाघ, सोनू येलकुचेवार आदींच्या पथकाने कारवाई केली. पथकाने अतिशय शिताफीने तपासाची सूत्रे हलवत, शहरातील तांत्रिक माहिती, गोपनीय खबर व स्थानिक चौकशीच्या आधारे अवघ्या 3 तासात आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला.

पोलिसांनी संशयित आरोपी सुजल विलास सोनवाने (वय २०) ,छगण मोहन दिघोरे (वय २७ ) अनिकेत शेषराव साखरकर (वय २४) तीन्ही रा. नेताजी वार्ड, चिमूर या आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. .

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी